कपिल शर्मा नेत्रदान करणार

0
293

मुंबई : विनोद सम्राट कपिल शर्मा याने नेत्रदान करण्याचा निर्धार केला आहे. कपिलने त्याच्या शोमध्ये भारताच्या दृष्टीहीन क्रिकेट संघाला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमानंतर त्याने नेत्रदान करण्याचे घोषित केले. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा एक छोटासा अवयवही खूप काही करू शकतो, याची कल्पनाही आपल्याला नसते, असे कपिल म्हणाला. माझ्यानंतरही कुणी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत असेल, तर त्याचा आनंद होईल, असेही तो म्हणाला.