परिवहन कार्यालयातील दलालांना पायबंद घाला

0
47

अन्यथा फौजदारी दाखल करा
सीसीटीव्हीवरून पटवा दलालांची ओळख
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांचे निर्देश
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ६ मार्च
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा मुक्त वावर असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. दलालांमुळे सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड पडण्यासोबतच त्यांची फसवणूकही होते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तत्काळ दलालांना पायबंद घाला, सीसीटीव्ही फुटेजद्वारे दलालांची ओळख पटवून प्रसंगी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिले.
जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. विविध विभागाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासंदर्भात त्यांनी हे निर्देश दिले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, उपवनसंरक्षक विजय हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय
भटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.