गोंदियात विशेष पथकाची गोदामावर धाड

0
61

तभा वृत्तसेवा
गोंदिया, ६ मार्च
सिंधी कॉलनी रस्त्यावरील चांदनी चौक परिसरातील एका गोदामावर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने धाड टाकून गोदामातून सिलेंडरचे ८९६ बनावट रेग्यूलेटर जप्त केले. ही कारवाई सोमवार, ६ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.
घमंडी बारसमोर प्रियांशी अपलाइनश या दुकानाचे गोदाम आहे. या गोदामात भारत गॅस, इंडेन, एचपी आदी कंपन्यांच्या सिलेंडरच्या नकली रेग्यूलेटरचा साठा असल्याची गुप्त माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने धाड टाकली असता गोदामात सिलेंडरचे ८९६ बनावट रेग्यूलेटर आढळून आले. या रेग्यूलेटरची किमंत चार लाख रुपये असल्याची माहिती आहे. पथकाकडून हे रेग्यूलेटर जप्त करण्यात आले. ही कारवाई विशेष पथक प्रमुख किशोर पर्वते, जितेंद्र बोरकर व कर्मचार्‍यांनी केली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे.