बेगम जानचा फर्स्ट लूक प्रदर्शित

0
312

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘बेगम जान’ चित्रपटासाठीचा उग्र महिलेच्या रूपातला पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. विद्या बालनने या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘‘मै आ रही हूं’’ असे तिने ट्विटर वरून शेअर केले आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे. या पहिल्या ओझरत्या दर्शनातील पोस्टरमध्ये ती आराम खुर्चीवर घागरा आणि खोल गळ्याची चोळी घालून हातात हुक्का पाईप घेऊन आरामात बसली आहे. एक रायफल देखील तिच्या बाजूला ठेवलेली आहे. या पोस्टरची मुख्य ओळ ‘माय बॉडी, माय हाऊस, माय कंट्री, माय रुल्स’ ही आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी असून हा चित्रपट २४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.