ट्रेंडचा विचार करत नाही : अनुष्का

0
363

मुबंई : अनुष्का शर्मा हिने तिच्या ९ वर्षाच्या कारर्कीदीत यशस्वी होण्यामागचे कारण तिने प्रवाहात वाहत जाण्यावर विश्‍वास ठेवला नाही, असे सांगितले. तिने २००८ मध्ये प्रर्दशित झालेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर अनेक दर्जेदार चित्रपटातून जसे ‘पी के’, खेळ-नाट्यावर आधारित असलेला ‘सुलतान’ आणि रोमँटिक नाट्याने परिपूर्ण असा ‘ए दिल है मुश्किल’ अशा चित्रपटातून तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या. अनुष्काने २०१५ मध्ये ‘एन एच १०’ या रोमांचित करणार्‍या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले आणि पुढील चित्रपट ‘फिलौरी’ हा तिच्याच क्लिन स्लॅट या बॅर्नरखाली तयार होतो आहे. दुसरे काय विचार करतात या गोष्टींनी मी कधीच प्रभावित होत नाही. कोणत्या प्रकारचा ट्रेंड सुरू आहे किंवा नाही याकडे मी फारसे लक्ष देत नाही. जेव्हा चित्रपट किंवा निर्मिती निवडण्याची वेळ येते तेव्हा मी माझ्या अंत:करणाचा आवाज ऐकते आणि मला जे माझ्यासाठी योग्य वाटतं तेच मी करते, असे अनुष्काने सांगितले.