ऍड. आशिष देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0
57

तभा वृत्तसेवा
पुसद, ७ मार्च
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी व जागतिक मानवाधिकार परिषद, तसेच आंतरराष्ट्रीय बार असोसिएशनद्वारा बुद्धिवंतांची जागतिक परिषद नागपूर येथे पार पडली. या परिषदेत गोवा ऍन्ड महाराष्ट्र बार असोसिएशनचे प्रशासक ऍड. आशिष देशमुख यांना न्यायमूर्ती किशोर रोही व हरिभाऊ केदार या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या परिषदेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या देशांतील विविध बुद्धिवंतांचा सहभाग होता. ग्रामीण भागातील वकील, महिला वकील, तसेच अनु. जाती-जमातीमधील वकिलांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकरिता भरपूर योगदान दिल्याबद्दल, ज्यांनी प्रथमच तालुक्याच्या वकिलाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाच्या अध्यक्षपदाचा मान मिळवून दिला अशा पुसदच्या ऍड. आशिष पंजाबराव देशमुख यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांवरून अभिनंदन होत आहे.