अमरावतीच्या महापौरपदी नरवणे; टिकले उपमहापौर

0
71

तभा वृत्तसेवा
अमरावती, ९ मार्च
अमरावती महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून भाजपाचे संजय नरवणे व उपमहापौर म्हणून याच पक्षाच्या संध्या टिकले प्रत्येकी ५६ मते घेऊन बहुमताने विजयी झाले. गुरुवार, ९ मार्चला झालेल्या या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १५ मते मिळाली.
या विजयाने तब्बल १८ वर्षांनंतर अमरावती मनपावर भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
जंगी विजयी मिरवणूक
मनपाची सत्ता बहुमताने ताब्यात घेतल्यानंतर भाजपाचे नवनिर्वाचित महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले यांची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली.