क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे भरल्यास २ टक्के शुल्क

0
19

वृत्तसंस्था
मुंबई, ९ मार्च
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला दोन टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. बँक ट्रांझॅक्शन चार्ज द्यावा लागू नये यासाठी अनेकजण पेटीएमचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कंपनीने तत्काळ हा निर्णय घेतला.
नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे टाकल्यास दोन टक्के शुल्क द्यावे लागेल. ८ मार्चपासून हा नवा नियम लागूही करण्यात आला आहे.
क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास २ टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणतेही शुल्क लागणार नाही. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे. क्रेडिट कार्डमधून पेटीएमवर एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
नोटबंदीनंतर पेटीएमने छोट्या दुकानदारांसाठी शून्य टक्के प्लॅटफॉर्म फी सुरू केली होती. लहान व्यापार्‍यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा, हा यामागचा उद्देश होता. पण अनेक यूजर्स पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. पण कोणतेही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमने हा निर्णय घेतला. पेटीएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कंपनीला बँक व्यवहारांसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरून ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावे लागते. जेव्हा यूजर्स पेटीएमवरून एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.