दहावीचा अभ्यास दीड महिन्यात केला : रिंकू

0
499

सोलापूर : सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू यावर्षी दहावीची परीक्षा देत आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर दीड महिन्यांच्या कालावधीत अभ्यास केल्याचे तिने सांगितले. वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला, असे रिंकू म्हणाली. दहावीच्या पेपरनिमित्त मैत्रिणींना भेटता येण्याचा आनंदही तिला आहे. सैराटचे शूटिंग आणि नंतर त्याचा कानडी रिमेक झाल्यामुळे अभ्यासापासून रिंकू काहीशी दुरावली. मात्र लाईट-कॅमेरा-ऍक्शन ते फिजिक्स-केमिस्ट्री हा प्रवास अवघड नसल्याचे रिंकू सांगते.