ऐश्‍वर्याचे वडील आयसीयूमध्ये

0
524

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रायचे वडील कृष्णराज राय हे मागील काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्‍वर्याच्या वडिलांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. तसेच आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. वडिलांना आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर ऐश्‍वर्या अभिषेक बच्चनसोबत बुधवारी रात्री रुग्णालयात गेली होती. अमेरिका दौर्‍याहून परतलेला अभिषेक तात्काळ ऐश्‍वर्यासोबत रुग्णालयात गेला. कृष्णराज मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयातील सामान्य वॉर्डमध्ये होते. पण आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.