मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य भेट

0
51

तभा वृत्तसेवा
गोंदिया, १० मार्च
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे १० मार्च रोजी गोंदिया येथे खाजगी दौर्‍यानिमित्त बिरसी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री चौहान यांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी मासिकाचा फेबु्रवारी २०१७ चा अंक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी भेट म्हणून दिला. यासोबतच त्यांना शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा जानेवारी व फेबु्रवारी २०१७ या महिन्यातील हिंदी लोकराज्य अंक सुद्धा भेट म्हणून दिले. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अरविंद हिंगे, अप्पर तहसीलदार के. डी. मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.