शिवसेनेचा आज रास्ता रोको

0
215

तभा वृत्तसेवा
अमरावती, १० मार्च
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवार, ११ मार्च रोजी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन शिवसेेेनेने पोलिस अधीक्षक व पोलिस आयुक्तांना दिले आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. या मागणीला अधिक बळ देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकर्‍यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे व महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे.