उडत्या तबकड्यांसारख्या जेलिफिश आढळल्या महासागरात!

0
261

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, ११ मार्च
उडत्या तबकड्यांसारख्या (यूएफओ- अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्‌स) दिसणार्‍या जेलिफिशचे नुकतेच अमेरिकेन सागरी जीवशास्त्रज्ञांच्या तुकडीने प्रशांत महासागरात चित्रीकरण केले. नॅशनल ओशिएनिक ऍण्ड ऍटमॉस्फेरीक ऍडमिनिस्ट्रेशनच्या चमूने हे चित्रीकरण केले असून, या उडत्या तबकड्यासदृश जेलिफिशची नेमकी ओळख पटलेली नाही. त्यांचे शास्त्रीय नाव ‘र्‍होपॅलोनमॅटिड ट्रॅकीमेडुसा’ असे आहे. या जेलिफिशना बघणे संमोहून टाकणारे आहे. या जेलिफिशचे चित्रीकरण करणार्‍या तुकडीने जेलिफिशला दुहेरी सोंडेप्रमाणे अवयव असल्याचे म्हटले आहे. दक्षिण प्रशांत महासागरात ही मोहीम संपूर्ण एप्रिलमध्ये चालणार आहे.