‘बाहुबली-२’ चे नवीन पोस्टर प्रदर्शित

0
388

मुंबई : दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘बाहुबली : दि कन्क्लुजन’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये कटप्पाने बाहुबलीला घेतलेले दिसत आहे, तर दुसरीकडे बाहुबली कटप्पाला मारताना दिसत आहे. ‘ज्या मुलाला त्याने वाढवले, त्याच मुलाला त्याने मारले’ या कॅप्शनसह राजामौली यांनी पोस्टर शेअर केले आहे. आमच्या डिझायनरला ही कल्पना सुचली आणि ट्विट करण्याचा मोह आवरला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदा २८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर याचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या सर्वांना पडलेल्या प्रश्‍नाचे उत्तर सिक्वेलमधून मिळणार आहे.