पोहरादेवीला लक्षचंडी विश्‍वशांती महायज्ञ

0
101

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, १४ मार्च
बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे २४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान लक्षचंडी विश्‍वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यज्ञाला उपस्थित राहावे, यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेृतत्वात एका शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.
बंजारा शक्तिपीठाचे संस्थापक संत रामराव महाराज यांच्या मार्गदर्शनात या महायज्ञाचे आयोजन होणार असून त्यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले.
यावेळी अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाचे सचिव बाबुसिंग महाराज हेही उपस्थित होते. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले असून २ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे भेट देणार असल्याचे समजते.