१९ वर्षांत पहिल्यांदाच पाकमध्ये आजपासून जनगणना

२ लाख सैनिकांची घेणार मदत

0
225

वृत्तसंस्था
इस्लामाबाद, १४ मार्च
पाकिस्तानात १९ वर्षांनंतर बुधवार, १५ पासून जनगणनेला प्रारंभ होणार असून या कामात पाक लष्कराचे २ लाखांपेक्षा अधिक सैनिक मदत करणार आहेत. ही माहिती लष्कराचे प्रवक्त मेजर जनरल आसिफ गफूर आणि माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत येथे दिली.
दोन टप्प्यात करण्यात येणार्‍या या जनगणनेचे कार्य पूर्ण करण्यासाठी २५ मेपर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जनगणना विषयीच्या तयारीची प्रत्येक जवान एका एन्युमरेटर (गणनाकार) सोबत जाऊन माहिती जमा करेल. या दरम्यान घराची माहिती आणि तेथे राहणार्‍यांची संख्या प्राप्त करतील. सैनिक एन्युमरेटर यांना सुरक्षा देण्याबरोबरच जमविण्यात आलेल्या माहितीच्या पडताळणीत देखील मदत करतील, असे गफूर यांनी सांगितले.
याशिवाय जनगणनेत १,१८,९१८ नागरी कर्मचारी भाग घेणार असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिला टप्पा बुधवार, १५ मार्चपासून आणि दुसरा टप्पा २५ एप्रिलपासून सुरू होणार असून तो २५ मे रोजी संपणार आहे. जनगणनेवर १८.५ अब्ज रुपये खर्च होतील, असे मरियम यांनी सांगितले.
चुकीची माहिती दिल्यास तुरुंगवास
जनगणनेमुळे निधीचे अचूक वाटप आणि इतर स्रोतांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यास मदत होईल. यावेळी चुकीची माहिती देणार्‍यास ६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल आणि त्याला ५० हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार असल्याचे मरियम म्हणाले. नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तान सरकारला जनगणनेचे काम टाळावे लागले