झक्कास बायकोसाठी रसिकांनी रशियात जावे…

0
210

‘वाईफ टुरिझम’चे जगभरात आकर्षण
वृत्तसंस्था
मॉस्को, १५ मार्च
सौंदर्याची आस कुणाला नसते? सारे जगच सौंदर्याचे चाहते आहे. त्यातही आपल्यासाठी ज्या काही गोष्टी माणूस पसंत करतो त्यात मुख्यत्वे सुंदर गोष्टींना अधिक प्राधान्य मिळणे स्वाभाविकच आहे. रशिया हा देश जगात अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. लोखंडी पडद्यामागचा हा देश अनेक गुपितेही बाळगून आहे. त्यातही दोन गोष्टींसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. एक म्हणजे इथली जीवघेणी थंडी व दुसरी म्हणजे येथील सुकोमल सुंदर युवती. रशियन महिलांचे सौंदर्य जगात नंबर एकचे समजले जाते व त्यामुळे येथे ‘वाईफ टुरिझम’साठी अन्य देशांतून येणार्‍या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.
‘वाईफ टुरिझम’ म्हणजे अन्य देशातील नागरिक रशियात बायको शोधण्यासाठी आवर्जून येतात. त्यात सर्वाधिक पर्यटक चीनमधले आहेत. त्याचेही कारण असे की चीनमध्ये ‘वन चाईल्ड पॉलिसी’मुळे मुलींचे प्रमाण कमी आहे व आता लग्नाळू वयात असलेल्या मुलांना तेथे मुली मिळत नाहीत. दुसरे म्हणजे रशियात मुलांपैक्षा मुलींची संख्या जास्त आहे व या मुली सौंदर्यवती आहेत. चिनी तरुण या बाबतीत सायबेरियातील मुलींना अधिक पसंती देतात. कारण या भागातील मुली अधिक सुंदर असतात. रशियात वाईफ टुरिझम हा आता व्यवसायच बनला
आहे.
रशियातील काही कायदेशीर विवाह संस्था लग्नाळू युवकांची त्यांना पसंत पडेल अशा मुलींबरोबर भेट घडवून आणतात. अन्य देशांतील बडे बडे व्यावसायिकही सुंदर पत्नीच्या शोधात रशियात येतात. त्यासाठी मॅरेज ब्युरोंची लाखो रुपयांची फी भरतात. अर्थात रशियन मुली स्वदेशी जोडीदाराला अधिक प्राधान्य देत असल्या तरी शेकडोंनी मुलींनी रशियाबाहेरच्या मुलांशी विवाह केले आहेत. रशियन मुलीबरोबर लग्न केले तर मुलाला रशियाची कायदेशीर विवाहपद्धती स्वीकारावी लागते, अशी माहिती आहे.