कॉंग्रेसमुक्त भारताचे श्रेय राहुलचे

0
59

मनोगत
राहुल गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्षपद व पक्षाचे नेतृत्व करायची पूर्ण मुभा द्यावी. त्यातच देशाचे उज्जल भवितव्य आहे. अजून अडीच वर्षे तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. कारण सध्याच्या अडीच वर्षात अर्धा भारत कॉंग्रेसमुक्त झाला आहेच, नंतरच्या अडीच वर्षात ते संपूर्ण देश कॉंग्रेसमुक्त बनवू शकतील यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त त्यांनी मोदींवर सतत टीका करणे सुरूच ठेवावे. त्यामुळे त्यांचे स्वप्न आणखी लवकर साकार होऊ शकेल. त्यांच्या या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा.
अमोल करकरे
पनवेल

याला म्हणतात, कॉंग्रेस पक्ष
गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वात अधिक जागा जिंकून पुढे आला. पण, कॉंग्रेसमधील लाथाळ्या केवळ महाराष्ट्रातच नाहीत, तर संपूर्ण देशात आहेत, हे त्या पक्षाने दाखवून दिले. वास्तविक पाहता लहान पक्षांचा कल कॉंग्रेसकडे जाण्याचा नव्हताच. त्यांनी भाजपाला जवळ केले आणि दोन्ही राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री विराजमान झाले. सारा देश हे दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत होता. यालाच म्हणतात कॉंग्रेस पक्ष. सामान्य कार्यकर्ता नेत्यांच्या बेताल वागण्यामुळे हैराण झाला आहे, हे या पक्षाला असे कसे दिसत नाही.
विशाल पाटील
पुणे

दिग्विजयसिंग मूर्ख, हटवा
कॉंग्रेस पक्षात सर्वाधिक विद्वान म्हणून ओळखले जाणारे दिग्विजयसिंग यांना तत्काळ महासचिवपदावरून हटवा अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केली आहे. म्हणजे, किती हा राग. एक निरीक्षक गोव्यात जातो, पण सर्वात मोठा पक्ष असूनही विधिमंडळ पक्षाचा नेता निवडू शकत नाही, हा केवढा दैवदुर्विलास. चौधरी मॅडम म्हणतात, या सिंगांमुळेच गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. अशा लोकांना पक्षात कोणतेही स्थान देऊ नये, असा घरचा अहेर चौधरी यांनी दिल्याने कॉंग्रेसमध्ये काय सुरू आहे, याचा अंदाज यावा.
अमोल गजभिये
नागपूर

केजरीवालांचा फुगा फुटला
पंजाब आणि गोव्यात आमचेच सरकार येणार अशी दर्पोक्ती अरविंद केजरीवाल यांनी केली होती. वस्तुस्थिती अशी आहे की, गोव्यात ४० पैकी ३९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. पंजाबात कशाबशा थोड्याशा जागा येऊ शकल्या. आता म्हणतात, ईव्हीएम मशिनने घोटाळा केला. अरे मूर्खांनो, दिल्ली विधानसभेच्या वेळीही हीच यंत्रे वापरली होती ना? तेव्हा का नाही मागणी केली. आता बोंंब मारत आहेत. तेव्हा, आता केजरीवाल यांचे पितळ उघडे पडले आहे, हे मात्र नक्की.
शैलेष जाधव
नागपूर