बांगलादेशात सुफी संघर्षातून हत्या?

0
210

एकास अटक
वृत्तसंस्था
ढाका, १६ मार्च
बांगलादेशात सुफी आध्यात्मिक नेत्याच्या आणि त्याच्या दत्तक मुलीच्या हत्येप्रकरणी एका ५७ वर्षीय सुफी पीरास अटक करण्यात आली आहे. इशाक अली नामक या सुफी पीरास त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
बांगलादेशात ७२ वर्षीय सुफी आध्यात्मिक नेता फरहाद हुसेन चौधरी आणि त्याच्या दत्तक २२ वर्षीय रुपाली बेगम या दत्तक मुलीची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. फरहाद हुसैन चौधरी आणि रूपाली बेगम यांच्या घराजवळच असलेल्या सुफी संप्रदायाच्या प्रार्थनास्थळासाठी निश्‍चित केलेल्या इमारतीजवळ या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. चौधरी आणि रूपाली या दोघांच्याही अंगावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. रूपालीचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरल्याचेही स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
चौधरी हे माजी पंतप्रधान खालिदा झिया अध्यक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या महापालिका क्षेत्राचे माजी अध्यक्षही होते.