मैत्रिणीच्या हत्येचा आरोपी तरीही फुटबॉल खेळणार

0
111

वृत्तसंस्था
ब्राझील, १६ मार्च
बोआ एस्पोर्ट या ब्राझीलच्या द्वितीय श्रेणी फुटबॉल क्लबने क्रीडा जगताला लाजवेल असे पाऊल उचलले आहे. या क्लबने मैत्रिणीची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या ब्रुनोस डिसुझा या फुटबॉलपटूशी दोन वर्षांचा करार केला आहे. ब्रुनोसने मैत्रीण एलिझा समुडिओ हिची हत्या केली व तिचे लचके तोडून ते आपल्या पाळीव कुत्र्याला खाऊ घातले, असा त्याच्यावर आरोप आहे. २०१० मध्ये त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यादाखल कोर्टाने २२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. नंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली व सुप्रीम कोर्टाने आरोप सिद्ध होईस्तोवर त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचे व पुन्हा खेळण्याचे आदेश दिले.
ब्रुनोचा संघात समावेश केल्यामुळे तीन प्रायोजित कंपन्यांनी क्लबसोबतचा करार रद्द केला, मात्र क्लब आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ब्रुनोला देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेने मुक्त केले आहे, तेव्हा त्याला खेळण्यापासून रोखणे योग्य नाही, असे क्लबने पत्रकातून म्हटले आहे.