नदालवर मात करून फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

0
146

पॅरिबस ओपन टेनिस
वृत्तसंस्था
इंडियन वेल्स, १६ मार्च
स्वीत्झर्लंडच्या स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती करीत पुन्हा एकदा स्पेनच्या राफेल नदालवर विजय नोंदविला.
पुरुष एकेरीच्या या सामन्यात फेडररने नदालला ६-२, ६-३ अशी मात देऊन पीएनबी पॅरिबस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान सुनिश्‍चत केले.
फेडररने आपल्या कारकीर्दीत प्रथमच स्पेनच्या स्टार खेळाडू नदालवर लागोपाठ तीन सामन्यात विजय नोंदविला. यापूर्वी फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात नदालला मात दिली होती. फेडररने नदालला ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असे हरवून विजेतेपद पटकावले होते. हे त्याच्या कारकीर्दीतले १८ वे ग्रॅण्डस्लॅम होते.
पॅरिबस ओपन स्पर्धेच्या अन्य उप-उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक कर्गियोसने द्वितीय विश्‍वमानांकित नोवाक जोकोविचवर ६-४, ७-६ (७-३) अशी धक्कादायक मात केली. उपांत्यपूर्व लढतीत किर्गीयोसची गाठ फेडररशी पडणार आहे.
महिला गटात स्वेतलाना कुजनेत्सोवाने उपांत्य फेरी गाठणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने रशियाच्या ऍनास्तासिया पाव्लुचेंकोव्हावर सरळ सेट्‌समधअये ६-३, ६-२ असा विजय नोंदविला.