आशिया चषकाच्या पात्रतेसाठी छेत्री सज्ज!

0
53

वृत्तसंस्था
मुंबई, १६ मार्च
विश्‍वचषक फुटबॉलमध्ये खेळण्याचे स्वप्न बघण्यापूर्वी सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या आधारावर एएफसी आशिया चषकासाठी पात्रता मिळविणे, यावरच भारतीय फुटबॉल संघाचे लक्ष केंद्रित आहे, असे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला.
आम्हाला या स्पर्धेसाठी पात्रता मिळवायची आहे. २८ मार्च रोजी म्यानमारविरुद्धचा सामना आम्ही निश्‍चितपणे जिंकू. गतवेळी म्यानमारविरुद्धच्या सामन्यात अनेक संधी गमावल्यानंतर आम्ही ०-१ ने पराभूत झालो आणि आमचे स्वप्न भंग झाले. आम्ही विश्‍वचषकात खेळण्याच्या गोष्टी करतो, परंतु त्याकरिता आधी स्वतःलाच उत्कृष्ट खेळाडू व्हायचे आहे. हे मोठे मापदंड आहे, एक वास्तव आहे, असेही तो म्हणाला.
जरी आम्ही खूप वेळ प्रशिक्षणात घालविला किंवा अधिकाधिक सामने खेळलो, त्याचा पुढे फायदा होईल, परंतु तो भूतकाळ होता. आता आमच्याकडे १३-१४ दिवसच शिल्लक राहिले आहेत. मुख्य प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाईन आमच्याकडून काय करू इच्छितात, हे सुनिश्‍चित व्हायला पाहिजे. कारण हा क्लब फुटबॉलपेक्षा अतिशय भिन्न आहे, असेही तो म्हणाला.