रायगडाला जेव्हा कोरड पडते…

९ हजार औषधी झाडे नष्ट

0
120

वृत्तसंस्था
महाड (रायगड),१७ मार्च
इतिहासप्रसिद्ध रायगड किल्ल्यावरील जवळपास ९ हजार औषधी झाडे पाण्याअभावी वाळल्याचे आढळून आले आहे. जलसंधारण योजनेअंतर्गत मागील जुलै २०१६ मध्ये जवळपास १६ हजार औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे.
सूत्रांनुसार, रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड किल्ल्यावर मागील वर्षी १६ हजार औषधी वृक्ष लावण्यात आले. या झाडांना पाणी देण्यासाठी आणि त्यांची निगा राखण्याचे काम काही मजुरांना देण्यात आले होते. मात्र, कमी मजुरी मिळत असल्याने त्यांनी या कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही आवश्यक ते सहकार्य न केल्याने ८ हजार ८२५ हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्या आहेत.