‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ १०० कोटी क्लबमध्ये!

0
263

मुंबई : आलिया भट आणि वरुण धवन यांची भूमिका असलेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्यातच १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला असून, जगभरात १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ ने गुरुवारी देशभरात ५.०६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तसेच, चित्रपटाची देशातील कमाई ७० कोटींपर्यंत पोहोचली असल्याची माहिती आहे. दरम्यान, चित्रपटनिर्मिती ते प्रमोशनपर्यंत निर्मात्यांनी सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ने पहिल्या दिवशी (१० मार्च) १२.२५ कोटी रुपये कमावले होते. दुसर्‍या दिवशी १४.७५ कोटीं, तर १२ मार्चला आतापर्यंतची सर्वाधिक १६.०५ कोटी खिशात टाकले. सोमवारी १२.०८ कोटी, मंगळवारी ७.५२ कोटी, बुधवारी ५.९५ कोटी तर गुरुवारी ५.०६ कोटी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ ने कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई ७३.६६ कोटींवर गेली आहे. दरम्यान, आलिया भट आणि वरुण हे तिसर्‍यांदा एकत्र काम करत असून, यापूर्वी त्यांनी ‘स्टुडंट ऑफ द ईयर’मधून बॉलिवूड एन्ट्री केली. त्यानंतर ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ मध्येही ते सहकलाकार होते.