राहुलने बेधडक काम करावे : दिग्विजय सिंह

0
88

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ मार्च
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी निर्णायकपणे काम करण्याची गरज आहे, असे मत कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
दिग्विजय सिंह म्हणाले, कॉंग्रेसची नव्याने बांधणी झाली पाहिजे आणि हे कार्य राहुल गांधी यांच्यापेक्षा कुणीही चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. अर्थात यासाठी नव्या पद्धतीने प्रचार करण्याची गरज असून, राहुल गांधी यांनी निर्णायकपणे काम केले पाहिजे!
राहुल गांधी निर्णायक भूमिका घेऊन काम करीत नाही, हे मी त्यांना अनेकदा सांगितले आहे. मी वारंवार याबाबत त्यांना सांगत असल्याने ते बर्‍याचदा माझ्यावर चिडतात, ही बाबही दिग्विजय सिंह यांनी उघड केली.