काश्मिरात मोठ्या प्रमाणात मतदान करा

• राम माधव यांचे आवाहन

0
126

वृत्तसंस्था
जम्मू, १८ मार्च
काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी निवडणूक बहिष्काराचे केलेले आवाहन काही नवीन नाही. लोकांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी शनिवारी येथे केले.
श्रीनगर आणि अनंतनाग येथे लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका आहेत. फू टीरतावाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले आहे. याचा समाचार घेत, प्रसारमाध्यमांशी बोलताना राम माधव म्हणाले, निवडणुका जेव्हा-जेव्हा तोंडावर येतात, तेव्हा-तेव्हा फुटीरतावाद्यांतर्फे बहिष्काराचे आवाहन केले जाते. नेमका तोच प्रकार यावेळी त्यांनी केला आहे. आम्हीही त्याला प्रत्युत्तर देत, मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाचे आवाहन करीत आहोत! लोकशाही हा एक उत्सव असून, या उत्सवात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. भाजपा या निवडणुकीत सहभागी होईल का असे विचारले असता, राम माधव म्हणाले, पीडीपीसोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय झाला पाहिजे.