आदित्यनाथ यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांना थप्पड

0
178

– उमा भारतींचे रोखठोक प्रतिपादन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ मार्च
योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे कट्टरपंथीयांना जोरदार थप्पड बसली आहे, असे रोखठोक वक्तव्य भाजपा नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. योगी आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीबाबत भारती यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तो क्षण आणि माझा लहान भाऊ आदित्यनाथ मुख्यमंत्री झाला हा क्षण सर्वाधिक आनंदाचा आहे, असेही उमा भारतींनी म्हटले. आदित्यनाथ हे विकास आणि राष्ट्रवाद हे दोन्ही मुद्दे घेऊन कार्य करतील, असे त्या म्हणाल्या.
योगी आदित्यनाथ यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांना चपराक बसली आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून कथित सेक्युलॅरिस्ट तसेच कट्टरवाद्यांनी वाद निर्माण केला आहे. उमा भारतींनी या लोकांना सणसणीत चपराक हाणली, असे राजकीय वर्तुळात मानण्यात येत आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात होणारी ओरड ही निरर्थक असून ते उत्तरप्रदेशाचा विकास घडवून आणतील असे त्या म्हणाल्या. आदित्यनाथ यांचा शपथविधी आज उत्तरप्रदेशमध्ये थाटात पार पडला.