तापसी-अक्षयचे धमाल नृत्य

0
271

मुंबई ः अभिनेत्री तापसी पन्नूसह अक्षय कुमार आणि नाम शबाना या आगामी चित्रपटातील मुख्य कलाावंतांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये थिरकायला लावणारे गाणे सादर करण्यात आले. चित्रपटाच्या प्रोमो व ट्रेलरनंतर आता दिल हुआ बेशरम… हे गाणे रविवारी प्रदर्शित करण्यात आले. कुमारने लिहिलेल्या गाण्याला मीत बंधूनी संगीतबद्ध केले असून, अदिती सिंग शर्माने हे गाणे गायले आहे. नीरज पांडे दिग्दर्शित नाम शबाना या चित्रपटात तापसीसोबत अक्षय कुमार, मनोज बाजपेयी, मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ३१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.