रजनीकांत संग दीपिका नाहीच

0
290

मुंबई ः बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी दीपिका पदुकोण सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत आगामी चित्रपटात भूमिका वठविणार असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शक पा. रंजीत याने दीपिका पदुकोण रजनीकांत यांच्या चित्रपटात एकत्र दिसणार नसल्याचे स्पष्ट केले. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या चित्रपटात रजनीकांतसोबत दीपिका पदुकोण झळकणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून जोर धरु लागल्या होत्या. या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर रंजीत याने त्याच्या आगामी चित्रपटाचा दीपिका पदुकोण चेहरा नसल्याचे स्पष्ट केले. चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.