वृत्तसंस्था
मुंबई, १९ मार्च
जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणार्‍या इजिप्तच्या इमान अहमदने पाच आठवड्यात तब्बल १४२ किलो वजन घटवले आहे. तिचे सध्या वजन ५०० किलोवरून ३५८ किलोवर पोहोचले आहे.
इमानवर डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जेव्हा तिचे भारतात आगमन झाले, त्यावेळी तिचे वजन तब्बल ५०० किलो होते. पण, डॉक्टर लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल १४२ किलो वजन घटवले आहे.
इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे. तेथे गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. लकडावाला यांनी दिली.
इमानवर ७ मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, या शस्त्रक्रियेपूर्वी तिने आहार आणि औषधोपचारांमुळे अवघ्या महिनाभरातच १०० किलो वजन घटवले होते. आता पुन्हा आहार आणि औषोधोपचारांद्वारे एकूण १४२ किलो वजन घटवले आहे.