तृणमूल खासदाराचे योगी आदित्यनाथ यांना समर्थन

0
164

वृत्तसंस्था
कोलकाता, २० मार्च
उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयामुळे अनेकांच्या पोटात दुखणे सुरू झाले. मात्र कोलकाताचे तृणमूल कॉंगे्रस पक्षाचे खासदार याला अपवाद ठरले. त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्या निवडीला समर्थन दिले आहे.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर योगी आदित्यनाथ यांची वर्णी लागल्यावर त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीलाच भाजपाने मुख्यमंत्री केले आहे. त्यांना उत्तरप्रदेशात बहुमत असल्याने तेथे कोणाला मुख्यमंत्री करायचे, हा भाजपाचा हक्क आहे, असे तृणमूल कॉंगे्रसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि खासदार सुलतान अहमद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
योगी आदित्यनाथ पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. लोकशाहीत मौलवी असो अथवा योगी प्रत्येकालाच राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचा समान अधिकार आहे. त्यांना लोकशाहीने निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यात गैर
काहीच नाही, असेही पुढे अहमद म्हणाले.