दुष्परिणाम नसलेले वेदनाशामक विकसित

0
178

जर्मनीच्या शास्त्रज्ञांचे यश
वृत्तसंस्था
बर्लिन, २० मार्च
वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामकचा (पेनकिलर्स) वापर करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता असे पेनकिलर विकसित करण्यात आले आहे की, त्यामुळे दुष्परिणाम अर्थात साईड इफेक्टची चिंता करण्याची गरजच नाही.
बर्लिन शहरामधील संशोधकांनी वेदनाशमक तयार करण्यासाठी नवी प्रक्रिया विकसित केली आहे. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधकांनी काम्प्युटेशनल सिमुलेशनचा वापर करत रिसेप्टर्सवरील औषधाच्या प्रभावाचे विश्‍लेषण केले. हे एक रिसेप्टर सेलची डॉकिंग साईट असून तेथेच वेदनाशमन औषध पोहोचते. ज्यावेळी एका प्राण्यावर अफिमसारख्या अणूचा वापर केला, तेव्हा संशोधकांना असे आढळून आले की, हा प्रोटोटाईप सुजलेल्या कोशिकांना वेदनांपासून मुक्त करण्यास सक्षम आहे.
मात्र, आरोग्यदायी कोशिकांवर याचा कोणताच प्रभाव पडला नाही. यातून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, वेदनाशमन औषधांशी संबंधित असलेल्या गंभीर परिणामांना दूर केले जाऊ शकते. आयओआडी हे एक स्ट्रॉंग पेनकिलर असल्याचे मानले जाते. याचा वापर प्रामुख्याने शस्त्रक्रिया, तंत्रिकांचे नुकसान, कॅन्सरमुळे होणारे कोशिकांचे नुकसान, सूज आणि वेदनांवर परिणामकारक उतारा म्हणून करण्यात येतो.