महिलेची अशीही कल्पकता! : कारला घर बनवून जगभ्रमंती

0
103

वृत्तसंस्था
लंडन, २० मार्च
इंग्लंडमध्ये एक अशी आगळीवेगळी महिला आहे, जिने कारलाच आपले घर बनवले असून, या ‘कारघरा’तून ती जगभ्रमंती करते. या महिलेचे नाव मरिना पिरो असे आहे. ही कार म्हणजेच माझे घर असल्याचे ती सांगते. तसेच प्रवासात तिचा पाळीव कुत्रा तिचा सोबती आहे. जग पाहण्याचे वेड मरिनाला स्वस्थ बसू देत नव्हते. एक दिवस जुनी कार व श्‍वानाला सोबत घेऊन ती भ्रमंतीला निघाली. मरिनाचा श्‍वानावर एवढा जीव आहे की, ती त्याला सतत सोबत ठेवते.
अतिशय कल्पकतेने मरिनाने कारचे रूपांतर घरात केले आहे. यासाठी एकूण दोन महिन्यांचा वेळ लागला. तिच्या कारमध्ये घरातील सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
कारमध्ये घरासारखे पडदे लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर आरामदायक बिछाना आणि स्वयंपाकघरही आहे.
मरिना विमानानेही जग भ्रमंती करू शकली असती. मात्र, श्‍वानाला एकटे सोडू शकत नसल्यामुळे तिने कारने प्रवास करण्याचे ठरविले.
बस, रेल्वे आणि विमान कंपन्या श्‍वानाला सोबत घेऊ देत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा पर्याय निवडावा लागला, असे मरिना सांगते.
इटलीत जन्मलेली मरिना सध्या ब्रिटनमध्ये राहते.