संजय कपूर तिसर्‍यांदा बोहल्यावर चढणार

0
355

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर पुन्हा एकदा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. हा त्याचा तिसरा विवाह ठरेल. नात्यात आलेल्या दुराव्यामुळे करिश्मा आणि संजय कपूर या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. करिश्मापासून फारकत घेतल्यानंतर संजय कपूरने त्याची तथाकथित प्रेयसी प्रिया सचदेवसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. संजयच्या निकटवर्तीयांनीच याबाबतचा खुलासा केला आहे. एप्रिल महिन्यात प्रिया आणि संजय एका समारंभात न्यूयॉर्कमध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करिश्माच्या आधी संजय कपूरचे लग्न डिझायनर नंदिता महतानीसोबत झाले होते. नंदितासोबत घटस्फोटानंतर दहा दिवसांनी संजयने करिश्माशी लग्न करण्याची घोषणा केला होती. पण दुर्दैवाने हे लग्नही फार काळ टिकले नाही. आता प्रिया सचदेवसोबत संजय तिसर्‍या लग्नाची तयारी करतोय.