फेडरर, व्हॅसनिना अजिंक्य

0
177

इंडियन वेल्स ओपन टेनिस
वृत्तसंस्था
इंडियन वेल्स, २० मार्च
रॉजर फेडररने स्टेन वावरिंकाला ६-४, ७-५ असे हरवून विक्रमाची बरोबरी साधत पाचव्यांदा एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे बाहेर राहिलेल्या फेडररने शानदार पुनरागमन करीत जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपनच्या रूपात आपले १८ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविले होते.
ऑल स्वीस फायनलमधील विजयासोबतच फेडररने येथे नोवाक जोकोविचच्या पाच विजेतेपद पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी साधली. यापूर्वी फेडररने येथे २००४, २००५, २००६ व २०१२ मध्ये विजेतेपद पटकावले होते.
एलिना व्हॅसनिनाने कडवी झुंज देत आपल्याच रशियन मैत्रीण स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हावर ६-७ (६/८), ७-५, ६-४ असा विजय नोंदवून इंडियन वेल्स ओपन महिला गटाचे विजेतेपद पटकावले. तीन तास एक मिनिट रंगलेल्या या अंतिम लढतीत व्हॅसनिनाने दोन वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणार्‍या कुझ्नेत्सोव्हाला मात दिली.