यवतमाळात कॉंग्रेस, भाजपा युतीचा झेंडा

0
122

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २१ मार्च
पंचायतराज व्यवस्थेतील शीर्षस्थ संस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सत्ता मिळाल्याचा आनंद जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवार, २१ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भारतीय कॉंग्रेसच्या माधुरी अनिल आडे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल यांची निवड झाली.
निवड झाल्यानंतर जिप अध्यक्ष माधुरी आडे व उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी पालकमंत्री मदन येरावार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
येरावार यांनी यावेळी शुभेच्छा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या सहचारिणी मीनल येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, अनिल आडे, आरिज बेग, जितेंद्र मोघे, मोहन जाधव यांच्यासह भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.