रोजगार: ‘इंग्रजी’चे महत्त्व!

0
101

नोकरी-रोजगाराच्या संदर्भातच नव्हे तर रोजगारासाठी आवश्यक असणार्‍या अभ्यासक्रमांदरम्यान पण इंग्रजी या व्यवहार भाषेचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झाले असून त्यासाठी व्यक्तिगत स्तरावर विद्यार्थी वा उमेदवार म्हणून व सामूहिक स्वरूपात संस्था म्हणून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येते-
या संदर्भात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या विद्यार्थी सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की, ‘आयआयटी’च्या कानपूर, दिल्ली, गुवाहाटी, खरगपूर, वाराणशी व रुडकी येथील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नव्यानेच प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे १ टक्का विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात आयआयटीच्या शिक्षणाला रामराम ठोकला. कारण? त्यांच्याकडे इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नव्हते.
संख्यात्मक स्वरूपात सांगायचे झाल्यास गेल्या वर्षी आयआयटीत पहिल्या वर्षाला प्रवेश घेणार्‍या एकूण ३,००० नव्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३० विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा या कारणावरून आयआयटी सोडून इतरत्र प्रवेश घेण्याला प्राधान्य दिले होते. सर्वेक्षणानुसार यामध्ये आयआयटी- दिल्लीच्या ८५० पैकी १२, आयआयटी- खरगपूरच्या १००० विद्यार्थ्यांपैकी ६, आयआयटी-गुवाहाटीच्या ६०० पैकी ५, तर आयआयटी- रुडकीच्या ९०० पैकी १० विद्यार्थ्यांचा समावेश होता, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
उमेदवारांच्या भाषाविषयक ज्ञानाच्या संदर्भात असे आढळून येते की, त्यांचे शालेय शिक्षण हे प्रामुख्याने हिंदी वा त्यांच्या प्रादेशिक भाषेत झाल्यामुळे त्यांना महाविद्यालयीन व विशेषत: अभियांत्रिकी वा तंत्रज्ञानविषयक शिक्षण घेताना इंग्रजी माध्यमाचा प्रश्‍न प्रामुख्याने येतो व त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या शिक्षणावर पण होत असतो.
या प्रश्‍नाचा नेमका मागोवा आयआयटी- कानपूरने काही वर्षांपूर्वी घेतला असून, त्यावर काही उपाययोजना पण सुरू केल्या आहेत. आयआयटी-कानपूरचे शैक्षणिक डीन प्रा. नीरज मिश्र यांच्या मते त्यांनी यासाठी संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेसंबंधी त्यांचे ज्ञान वा प्रभुत्व जाणून, त्यांची चाचणी घेऊन या चाचणीद्वारा गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे विशेष मार्गदर्शनवजा ज्ञान देण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
याचेच अनुकरण आयआयटी-रुडकीमध्ये पण करण्यात आले. संख्यात्मकदृष्ट्या रुडकीमधील या प्रयोगाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास आयआयटी-रुडकीमध्ये गेल्या वर्षी इंग्रजीच्या अपुर्‍या ज्ञानामुळे ७० विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षात शिक्षण सोडावे लागले होते व यंदा हीच संख्या केवळ १० वर आल्याने या इंग्रजी उपक्रमात सहभागी झालेल्या सार्‍यांचाच उत्साह वाढला आहे.
आयआयटीच्या विविध विद्याशाखांमध्ये नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी जे प्रयत्न प्रामुख्याने केले जात आहेत, त्यामध्ये भाषा सुधार सत्र, सहकार्‍यांशी संभाषणाकरवी मार्गदर्शन, वरच्या वर्गातील विद्यार्थी-सहकार्‍यांशी संभाषण, निवडक विद्यार्थ्यांना इंग्रजीतील जाणकारांचे विशेष मार्गदर्शन इ. सार्‍यांचा उपयोग करण्यात येत असून आयआयटी- रुडकीचे संचालक प्रदीप्त गुप्ता यांच्या मते या सार्‍या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम संस्थेत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे.
शैक्षणिक संदर्भात विद्यार्थिदशेच्या समाप्तीनंतर विविध क्षेत्रातील पात्रताधारक विद्यार्थी जेव्हा उमेदवार म्हणून नोकरी-रोजगाराच्या शोधार्थ असतात तेव्हासुद्धा त्यांच्या इंग्रजी भाषाविषयक अडचणी वा मर्यादा वेळोवेळी स्पष्ट होतात.
नोकरीच्या शोधार्थ असणार्‍या अथवा रोजगारविषयक मुलाखत देणार्‍या उमेदवारांच्या माहिती-अर्जाच्या संदर्भात व्यवस्थापन वा कंपन्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या संदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या सर्वेक्षणात पुढील बाबी प्रकर्षाने पुढे आल्या आहेत-
– नोकरी-रोजगारासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांपैकी सुमारे ३३ टक्के जणांचे अर्ज चुकीचे वा चुकांनी भरलेले असतात.
– ३५ टक्के उमेदवारांचे अर्ज अस्पष्ट वा वाचण्याच्या दृष्टीने त्रासदायक असतात.
– २६ टक्के उमेदवारांनी दिलेले ई-मेल संपर्क चुकीचे वा वापरात नसलेले, कालबाह्य स्वरूपाचे असतात.
– सर्वेक्षणात प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे ५५ टक्के उमेदवारांचे रोजगार अर्ज हे पीडीएफ शैलीत असतात तर उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची निवड करणार्‍या अधिकांश म्हणजेच ६८ टक्के व्यवस्थापक-व्यवस्थापन क्षेत्रातील मंडळी वर्ड शैलीच्या माहितीपर अर्जाला प्राधान्य देतात.
– उमेदवारांच्या रोजगार अर्जाच्या संदर्भात बहुतांश उमेदवारांची अशी धारणा असते की, मुख्य अर्जासह आपली वैयक्तिक-शैक्षणिक माहिती व अनुभवाचे विवरण संलग्न करणे फायदेशीर व परिणामकारक ठरते. मात्र सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश म्हणजेच चक्क (७२ टक्के) ६२ टक्के प्रतिसाद देणार्‍यांच्या मते उमेदवारांच्या माहितीसह असणार्‍या पत्राचा फारसा उपयोग होत नसतो.
‘टाईम्स जॉब सर्व्हे’च्या पुढाकाराने सुमारे १,००० उमेदवार व व्यवस्थापक-व्यवस्थापनाशी संपर्क करून करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सर्वेक्षणानुसार उमेदवारांच्या रोजगाराच्या संदर्भात असे पण आढळून आले आहे की, बहुतांश उमेदवारांना खूपच सविस्तर वा विस्तारवजा अर्ज लिहिणे आवडते. याउलट नोकरीच्या योग्यतेच्या संदर्भात त्यांचा विचार करण्याच्या दृष्टीने मुलाखत घेणार्‍या व्यवस्थापकांची साहजिक पसंती असते ती संक्षिप्त वा मुद्देसूद प्रारूपवजा अर्जाला.
अर्जाच्या मजकुराच्या संदर्भात पण मुद्दा असतो तो म्हणजे अर्जात नमूद केलेला अर्जदाराचा मजकूर हा व्यवस्थापनाने जाहिरातीत वा उपलब्ध रोजगार संधीशी संबंधित वा संयुक्तिक आहे अथवा नाही याचेशी. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, संबंधित कामाचा अनुभव वा अनुषंगिक मजकूर वा तपशील असंबद्ध अथवा गैरलागू असल्यास अशांचे अर्ज मुलाखत-निवडीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातच बाद होऊ शकतात, हे या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
अर्जदारांच्या अर्जाची धाटणी-मांडणी वा रचना विशिष्ट क्रमवार, संयुक्तिक व सुलभ स्वरूपाची असणे म्हणूनच महत्त्वाचे असते. उमेदवारांनी यासंदर्भात लक्षात ठेवण्याची महनीय बाब म्हणजे उमेदवाराच्या नोकरी-रोजगाराच्या अर्जाच्या संदर्भात त्याच्या व्यक्तिगत छायाचित्रापेक्षा पण अधिक महत्त्वाची बाब ठरते ती उमेदवाराने आपल्या अर्जात केलेली माहितीची मांडणी-आखणी. या मांडणीच्या शैली-पद्धतीवरूनच उमेदवारांच्या रोजगाराच्या संदर्भात असे पण आढळून आले आहे की, बहुतांश उमेदवारांना खूपच सविस्तर वा विस्तारवजा अर्ज करणे आवडते. तर याउलट नोकरीसाठी त्यांचा विचार करण्याच्या दृष्टीने मुलाखत घेणार्‍या व्यवस्थापकांची साहजिक पसंती असते ती संक्षिप्त व मुद्देसूद प्रारूपवजा अर्जाला. अर्जाच्या मजकुराच्या संदर्भात पण मुद्दा असतो तो म्हणजे अर्जात नमूद केलेला अर्जदाराचा मजकूर हा व्यवस्थापनाने जाहिरातीत वा उपलब्ध रोजगार संधीशी संबंधित वा संयुक्तिक आहे अथवा नाही. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता, संबंधित कामाचा अनुभव वा अनुषंगिक मजकूर वा तपशील असंबद्ध अथवा गैरलागू असल्यास अशांचे अर्ज मुलाखत-निवडीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातच बाद होऊ शकतात, हे यासंदर्भात महत्त्वाचे ठरते.
अर्जदारांच्या अर्जाची धाटणी-मांडणी वा रचना विशिष्ट क्रमवार, संयुक्तिक व सुलभ स्वरूपाची असणे महत्त्वाचे ठरते. प्रसंगी अर्जदाराच्या छायाचित्राच्या जोडीला नव्हे त्याहून अधिक महत्त्वाची ठरते ती अर्जदाराने आपल्या अर्जात केलेली माहितीची आखणी- मांडणी. या मांडणीच्या शैली-पद्धतीवरूनच संबंधित व्यवस्थापक अर्जदाराच्या प्राथमिक वा सकृतदर्शनी योग्यतेबद्दल विचार करीत असतो.
इंग्रजी भाषेच्या संदर्भात या सर्वेक्षणाद्वारे पण लक्षात आलेली प्रमुख बाब म्हणजे ५५ टक्के व्यवस्थापकांच्या मते नोकरीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी अचूक इंग्रजीचे पुरेसे ज्ञान अनिवार्य असून, ते याच भूमिकेने अर्जदारांच्या अर्जातील भाषेवर विचार करतात. या व्यवस्थापकांच्या मते उमेदवारांच्या अर्जातील व्याकरणविषयक अचूकपणाला ते निश्‍चितच महत्त्व देतात व त्या दृष्टीने उमेदवारांनी आपल्या अर्जात अचूक इंग्रजीचा कटाक्षाने वापर करणे अखेर त्यांच्याच हिताचे ठरते.
थोडक्यात म्हणजे आजच्या संदर्भात इंग्रजीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावर सुरू होते व चांगली आणि अचूक इंग्रजी भाषा त्यांना नोकरी-रोजगाराच्या संदर्भात पण तेवढीच उपयुक्त ठरते.
– दत्तात्रय आंबुलकर
९८२२८४७८८६