लाखो रुपयांचा कापूस भस्म
तभा वृत्तसेवा
घाटंजी, २४ मार्च
येथील औद्योगिक विकास महामंडळ परिसरात असलेल्या शिव ऍग्रो जिनिंगला लागलेल्या भीषण आगीत ४० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शुक्रवार, २४ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास लागली.
शिव ऍग्रो जिनिंगमध्ये शेतकर्‍यांचा कापूस मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यावर प्रक्रिया करून गठाणी तयार करण्यात येतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण करून गठाणींसह काही यंत्रसामुग्रीही आपल्या कवेत घेतली. या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यवतमाळातून अग्निशमन दलाचे दोन बंब रवाना झाले होते. तर घाटंजी येथून नगर परिषदेच्या एका ट्रॅक्टरद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम उशिरापर्यंत सुरूच होते. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही.