गोदावरी अर्बनला ‘बँको पुरस्कार’

0
55

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २६ मार्च
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला बँकिंग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०१५-१६ चा बँको पुरस्कार पुणे येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात नॅशनल बँक फेडरेशनचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना उपाध्यक्ष हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, उपसरव्यवस्थापक वंदना नखाते, प्रशासकीय अधिकारी सुरेखा दवे व शाखाधिकारी संतोष आदे उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून प्रशिक्षण, प्रकाशन, पुरस्कार, प्रोत्साहन अशा विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून मान्यता पावलेल्या अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलॅक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पुरस्कार बँकिंग क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांना हे पुरस्कार देण्यात येतात. २०१५-१६ चा प्रतिष्ठेचा बँको पुरस्कार मल्टिस्टेट विभागातून गोदावरी अर्बन मल्टिस्टेट सोसायटीला प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे निकष ठरवताना तज्ज्ञ निवड समितीमार्फत अत्यंत कडक कसोट्यांमधून पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यात येते. ज्या पतसंस्थांकडून वेळोवेळी केलेल्या लेखा परीक्षणातून दैनंदिन व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील सर्व आदर्श निकषांचे पालन केले जाते, अशाच पतसंस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
गेल्या तीन वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीत गोदावरी अर्बनने गरुडझेप घेतली आहे. बचतगटाच्या महिला, दुग्धव्यवसाय करणारा सामान्य शेतकरी, छोटा व्यवसासी असो की मोठा कारखानदार, प्रत्येकाच्या मागणीची नियमबद्ध पूर्तता करणारी संस्था म्हणून गोदावरी अर्बनकडे आपुलकीने पाहिल्या
जाते.
या पुस्काराचे श्रेय संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व त्यांच्या मार्गदर्शनात काम करणार्‍या अत्यंत प्रशिक्षित व कार्यतत्पर अशा अधिकारी व कर्मचारी वर्गाला जाते आणि यामुळेच संस्थेला हा पुरस्कार मिळाला, असे गौरवोद्गार संस्थापक आमदार हेमंत पाटील यांनी काढले. प