सवलतींची खैरात अन् खरेदीदारांची झुंबड

0
97

वाशीममधील शोरूमध्ये स्टॉक आऊट
भारत स्टेज-३ बंदीचा परिणाम
भगवान कोतीवार

वाशीम, ३१ मार्च ङङ
भारत स्टेज-३ प्रमाणपत्र असलेल्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली आणि दुचाकी व चारचाकी विक्रेत्यांकडे असलेल्या स्टॉकबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर ग्राहकांसाठी सवलतींची खैरात जाहीर केली. त्यामध्ये तीन हजार ते २२ हजारापर्यंत सूट देण्यात आली. याचाच फायदा घेण्यासाठी हजारो ग्राहकांनी शहरातील विविध कंपन्याच्या शोरूमवर शुक्रवार, ३१ रोजी एकच झुंबड केली आणि पाहता पाहता स्टॉक आऊट अशी पाटी लावून विक्रत्यांनी शोरूमचे शटर डाऊन केल्याने ग्राहक रिक्तहस्ते परतलेे.
वाशीम शहरात होंडा कंपनीचे बालाजी, यामाहाचे कांता ऑटोझोन, हिरो कंपनीचे सोहन ऑटोबाईक, टीव्हीएस कंपनीचे व्यंकटेश व इतर कंपन्याच्या शोरूम आहेत. तेथे शेकडो वाहनंाचा स्टॉकही होता. अशातच भारत स्टेज-३ प्रमाणपत्र असलेल्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच वाहन निर्मात्या कंपनी व विक्रत्यांचे धाबे दणाणले. स्टॉक असलेली वाहने विक्रीची चिंता त्यांना होतीच. त्यावर उपाय म्हणून वाहन खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी दुचाकी कंपन्यांनी सवलतींची खैरात जाहीर केली. त्यामध्ये एका वाहन खरेदीवर विविध कंपन्यांनी ५ हजारापासून तर २० हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली. त्याची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात केली. मोबाईलवर मेसेजही टाकले. वाहन खरेदीवर मिळणार्‍या सवलतीचा लाभ घेण्यासाठी खरेदीदारांनी सकाळपासूनच शोरू समोर रांगा लावल्या होत्या.
शुक्रवार, ३१ मार्च रोजी सकाळपासूनच स्थानिक वाहन कंपन्यांच्या शोरूमसमोर वाहन खरेदीदारांची झुंबड उडाली होती.
शहरातील सर्वच कंपन्याच्या शोरूममध्ये जवळपास २ ते २५०० दुचाकी वाहनांचा स्टॉक होता. त्यात होंडा व हिरो कंपनीची वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. तास दोन तासातच शोरूममध्ये असलेला वाहनांचा स्टॉक हातोहात संपला आणि चालकांना शोरूमचे शटर डाऊन करण्याची वेळ आली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाड्यांची आधीच विक्रमी विक्री झाली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत स्टेज-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली. त्यामुळे ग्राहकांनी जोरदार खरेदी करून दुसर्‍यांदा पाडवा साजरा केला.
जाहीर सवलतींचा फायदा घेत ग्राहकांनी चारचाकी वाहनेदेखील खरेदी केली. (तभा वृत्तसेवा)