९ गोंधळी आमदारांचे निलंबन मागे

0
50

मुंबई, १ एप्रिल 
शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळात गदारोळ करणार्‍या विरोधी पक्षांच्या ९ आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा आज संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. ३१ डिसेंबरपर्यंत १९ आमदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव २३ मार्च रोजी मंजूर करण्यात आला होता. इतर १० आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचा अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी अर्थसकंल्पाबाबत तीव्र आक्षेप घेत सभात्याग करीत कामकाजावर बहिष्कार टाकला होता. विरोधकांचा बहिष्कार सुरूच असून, कर्जमाफीसाठी त्यांचा राज्यभरात संघर्ष सुरू आहे. घ(तभा वृत्तसेवा)