मुख्यमंत्री आज पोहरादेवीत

0
152

वाशीम, १ एप्रिल
देशभरातील बंजारा बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे २४ पासून विश्‍वशांती लक्ष चंडी यज्ञाला सुरुवात झाली. यामध्ये पाठपूजा व मंत्र जप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहेत. रविवार, २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत येणार आहेत.
बंजाराबांधवांचे श्रद्धास्थान पोहरागड येथील माता जगदंबा, जगद्गुरू सेवालाल महाराज, डॉ. रामराव महाराजांच्या सेवाश्रम मंदिरस्थळी भाविक नतमस्तक होतात. यावर्षी प्रथमच धर्मगुरू संत रामराव महाराजांनी केलेल्या संकल्पातून विश्‍वशांती लक्ष चंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी देशभरातून २१०० ब्राह्मणांच्या हस्ते होमहवन पार पडत आहेत. घ(तभा वृत्तसेवा)