२०२० पर्यंत असेल २ कोटी ऍप डेव्हलपरची गरज

0
63

मोबाइल ऍप्लिकेशनचा उपयोग वाढला
नवी दिल्ली, १० एप्रिल 
देशात स्मार्टफोन युजरची वाढत्या संख्येने विभिन्न प्रकारच्या मोबाइल ऍप्लिकेशनचा उपयोग वाढला. शॉपिंगपासून ते ऑनलाइन पेमेंट, रिचार्ज करणे, गेम खेळण्यापर्यंत मोबाइल ऍप्लिकेशनचा उपयोग होत आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांत याच्या बाजारात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
मोबाइल ऍप हा एका प्रकारचा सॉफ्टवेअरच असतो, जो खास मोबाइलसाठीच बनविला जातो. हे ऍप्लिकेशन कॉम्प्युटर सॉफ्टवेअरपेक्षा कमी आकाराचा असते. मोबाइल ऍप्लिकेशनचा बाजार फक्त साधारण युजरपर्यंतच केवळ नाहीये तर, व्यापारी व संस्था प्रतिष्ठानेदेखील याचा उपयोग करतात. देशात स्मार्टफोन युजर आणि इंटरनेट ग्राहकांच्या वाढत्या संख्येने या उद्योगात रोजगाराच्या नव्या शक्यता निर्माण झाल्यात. आयएएमएआयच्या अनुसार २०२०च्या शेवटापर्यंत देशात २ कोटी ऍप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता असेल. अशात युवकांसाठी हे रोजगाराचे माध्यम बनू शकते आहे.
चौथी सर्वात मोठी ऍप इकॉनॉमी
एका अहवालानुसार भारत जगातील चौथी सर्वात मोठी मोबाइल ऍप इकॉनॉमी आहे. याशिवाय भारतीय लोकांद्वारे मोबाइल ऍप्लिकेशनचा उपयोग करण्याचा काळही पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक झाला आहे. जेव्हा ऍप डाउनलोड करण्याची गोष्ट आली तेव्हा अमेरिका, चीन आणि ब्राझीलनंतर भारतातच सर्वाधिक ऍप डाउनलोड केले जात आहेत. एका अनुमानानुसार देशात ऍप डाउनलोडची संख्या २०२० च्या अखेरपर्यंत जवळपास २० अब्ज असेल. अशातील काही वर्षात भारतात रिटेल ऍपमध्ये खर्च जवळपास ११.५ टक्के वाढला आहे. तथापि या दरम्यान व्हिडिओ स्ट्रीम ऍपची संख्या ७.४ पटीने वाढली आहे.
वर्तमानात टीव्ही चॅनेलपासून ते मॅच स्ट्रीम आणि न्यूज पर्यंतसाठी मोबाइल ऍप्लिकेशनचा उपयोग वाढला आहे. कार नेव्हिगेशन, एंटरटेनमेंट, शॉपिंग, कॉमर्स आणि बँकिंगसाठी मोबाइल ऍप्लिकेशन लोकांची गरज झाली आहे. विभिन्न स्मार्टफोन कंपन्यादेखील नव्या प्रकारचे ऍप बनविण्यावर जोर देत आहेत. आणि यामुळे याचा बाजारही वेगाने वाढतो आहे. तथापि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सातत्याने बदलाच्या गोष्टींचा उपयोग करण्याच्या पद्धतीही बदलत राहतात. यासाठी मोबाइल ऍप डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांना उद्योगाची मागणी आणि ट्रेंड (प्रवाह) च्या अनुसार स्वत:ला सातत्याने अपडेट करत राहावे लागते. हे ऍप बहुतांश अँड्रॉइड वा आयओएस ऑपरेटिंग सिस्टिममध्ये उपयोगात आणले जातात. काही इतर ऑपरेटिंग सिस्टिमसाठीदेखील ऍप बनविले जातात. याशिवाय मोबाइल वेब आधारित ऍपदेखील बनविले जाताहेत, ज्यात एचटीएमएल ५ चा उपयोग केला जातो आहे आणि यासाठी ब्राउजरची गरज असते.(वृत्तसंस्था)