साप्ताहिक राशिभविष्य

0
435

रविवार, १६ ते २२ एप्रिल २०१७
सप्ताह विशेष
• सोमवार, १७ एप्रिल – भद्रा (प्रारंभ २४.३३), मच्छींद्रनाथ यात्रा- मच्छींद्रगड, वाळवे (सातारा)े; मंगळवार, १८ एप्रिल – भद्रा (समाप्त १३.३४); बुधवार, १९ एप्रिल – कालाष्टमी, वृषभायन (२६.५७), सौर ग्रीष्मऋतु प्रारंभ; गुरुवार, २० एप्रिल – प्लूटो वक्री, श्री सीताराम महाराज कर्‍हाडे पुण्यतिथी- उदखेड (मोर्शी); शुक्रवार, २१ एप्रिल -भद्रा (१६.५२ ते २८.५२), श्री नाना महाराज तराणेकर पुण्यतिथी- इंदोर व नागपूर, सौर वैशाख मासारंभ; शनिवार, २२ एप्रिल – वरुथिनी स्मार्त एकादशी, रेडा समाधी यात्रा- आळे (जुन्नर).
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- १६, १७, १९,२० व २१ एप्रिल; बारसे- १७,१९,२० व २२ एप्रिल ; जावळे- २० व २१ एप्रिल ; गृहप्रवेश- १७,१९, २१ व २२ एप्रिल.
मेष- संधीचा लाभ घ्या
राशीस्वामी मंगळ कुटुंबस्थानात सक्रिय आहे. तेच आपले अर्थस्थानही आहे. त्याच्या प्रभावाने एखादे मंगलकार्य ठरू शकेल. घर, जमीन-जुमल्याचे व्यवहार सफल होऊ शकतील. अचानक एखादी संधी लाभू शकेल. तिचा लाभ घ्यावयास हवा. नोकरी वा व्यावसायिक निमित्ताने आपणांस प्रवास किंवा दौरा घडू शकतो. प्रवास सफल राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात थोडा मानसिक त्रास संभवतो. दगदग, धावपळ यामुळे शरीर व मनावर ताण येऊ शकतो. प्रकृतीला जपावयास हवे. दरम्यान, नोकरी- व्यवसायातील स्पर्धक वा शत्रूंच्या कारावाया वाढू शकतात. त्यांच्याकडे लक्ष असावे.
शुभ दिनांक- १७,१८,२२.
वृषभ- करीयरसाठी योग्य संधी
राशीत मंगळ व राशीस्वामी शुक्र लाभात ही व्यावसायिक लाभाची स्थिती आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेऊ शकता. नव्या क्षेत्रात पदार्पणासाठी देखील हा काळ उत्तम आहे. गुंतवणुकीत फायदा होऊ शकेल. नवीन तंत्रज्ञान, संकल्पना राबवून आपला व्यवसाय अधिक आकर्षक व सफल करू शकाल. युवा वर्गाला नोकरीच्यादृष्टीने देखील या काळात उत्तम योग यावेत. थोडक्यात करियरच्या दृष्टीने काही कामें व्हावीत. काही युवावर्गाचे विवाह जुळून येऊ शकतात. त्याचप्रमाणे नवपरिणितांना संततीयोगाबाबत काही चांगले योग येऊ शकतात. काहींना परदेशगमनादि योग संभवतात.
शुभ दिनांक- १६,१९,२१.
मिथुन- व्यावसायिक व्यग्रता, दगदग
हा आठवडा प्रामुख्याने कार्यालयीन आणि व्यावसायिक संधीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. काहींना अतिशय व्यग्रतेचा आणि दगदगीचा हा आठवडा असू शकतो. तर काहींना हा काळ प्रकृतीच्या दृष्टीने तापदायक जाण्याची शक्यता आहे. कार्यालयात नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. याचे लाभ दीर्घकालीन लाभ आपणास अवश्य मिळतील. काहींचे वाहन, स्थावर मालमत्तासंबंधीचे व्यवहारघडून येऊ शकतात. हा संपूर्ण आठवडाच आपणास उत्तम व समाधान देणारा रहावा. विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येण्याची शक्यता राहील. घरात पाहुणे, मित्रमंडळींचा राबता राहील.
शुभ दिनांक- १७,१८,२२.
कर्क- नोकरीत आकस्मिक घडामोडी
या आठवड्यात राशीस्वामी चंद्र पंचमातून लाभस्थानावर दृष्टी ठेवबन आहे. तेथील मंगळ नोकरीत काही आकस्मिक घडामोडी घडवून आणू शकतो. त्यामुळे आपल्यावर एखादी विशेष जबाबदारी सोपविली जाणे किंवा कामाच्या स्वरूपात बदल घडून येणे संभवते. विवाहयोग्य मुला-मुलींचे कार्य जुळून येण्याची शक्यता राहील. घरात पाहुण्यांचा राबता राहील. त्यामुळे आनंदी व उत्साही वातावरण राहावे. आठवड्याच्या शेवटी मोठे आर्थिक व्यवहार जरा जपूनच करावेत. विशेषतः शेअरबाजार, सट्टाबाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी बाजाराचा कल विचारात घेऊनच पुढे पाऊल टाकावे.
शुभ दिनांक- १६,१८,२०.
सिंह- प्रगतीला चालना मिळेल
राशीस्वामी रवि भाग्यस्थानात असल्यामुळे काही भाग्यकारक व प्रगतीला चालना देणार्‍या घटना घडू शकतात. व्यवसाय विस्तार, नवी गुंतवणूक वगैरे करता येऊ शकेल. सरकारी नोकरीत किंवा खाजगी क्षेत्रात असणार्‍यांना देखील आर्थिक लाभ होऊ शकतो. काहींना बदली किंवा कामात बदल केला जाऊ शकतो. काहींना व्यवसायात बरीच धावपळ, मेहनत करावी लागू शकते. काही कुटुंबात मात्र एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. वाहन खरेदी, सहकुटुंब प्रवास यांची आखणी करता येईल. काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपले पथ्यपाणी सांभाळावयास हवे.
शुभ दिनांक- १७,१९,२०.
कन्या- जोडीदाराची निवड व्हावी
राशीस्थानी गुरु व सप्तमात शुक्र या स्थितीमुळे या राशीच्या काही विवाहेच्छू तरुण-तरुणींना विवाह जुळण्याच्या दृष्टीने काही चांगले येऊ शकतील. पसंतीचा जोडीदार निवडता येऊ शकेल. व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा उत्तम व प्रगतीकारक जावा. भाग्यातील मंगळामुळे काही नवे धाडस करता येऊ शकेल व त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील. विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना चांगले योग येऊ सकतात. राशीस्वामी बुध वक्री व अस्तंगत असल्यामुळे या राशीच्या मंडळींनी प्रकृतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपले पथ्यपाणी व औषधोपचार सांभाळावयास हवा.
शुभ दिनांक- १९,२०,२१.
तुला- व्यवसाय विस्ताराच्या संधी
राशीस्वामी शुक्र षष्ठ या नोकरीच्या व करियरसंबंधी स्थानात असून त्याच्यावर गुरुची शुभ दृष्टी आहे. त्याच्या प्रभावाने या राशीच्या मंडळींना नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या संधी लाभू शकतात. व्यवसायात असलेल्यांना काही नवे करार होऊन विस्तार करता येईल. नोकरीत असलेल्यांना चांगल्या संधी लाभू शकतात. नोकरी-व्यवसायातील आपली प्रतिष्ठा टिकून राहील. गुरु-शुक्राच्या समसप्तकामुळे युवा वर्गाला विवाहादी शुभयोग येऊ शकतात. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नाटक, सिनेमा, प्रवास, मंगलकार्यातील सहभाग आनंद देईल.
शुभ दिनांक- १६,१९,२०.
वृश्‍चिक- समाधानकराक स्थिती
राशीस्वामी मंगळ सप्तमातून आपल्याला बळ देत आहे. त्यामुळे आपल्याला सर्वसाधारणपणे समाधान लाभण्याचे योग यावेत. तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम संधी येऊ शकतात. घरात विवाहेच्छू मुला-मुलींचे शुभमंगल जुळून येण्यासाठीच्या हालचालींना वेग येईल. काही मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागू शकते. यामुळे कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र नोकर वर्गाला छुप्या शत्रुंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. अचानक एखादी आव्हानात्मक घटना उद्भवण्याची शक्यता आहे. अशात शांतपणे परिस्थिती हाताळणे श्रेयस्कर राहील.
शुभ दिनांक- १६,१७,१८.
धनु- कामात बदल संभव
राशीस्वामी गुरु दशम या कर्मस्थानातून तरुणांना नोकरी-व्यवसायाच्यादृष्टीने उत्तम संधी देऊ शकतो. सोबतच त्याची शुक्रावर दृष्टी असल्याने तरुणांच्या विवाहाच्या दिशेने वेगवान हालचाली संभवतात. काहींना त्यांचा जोडीदार या काळात निवडता येऊ शकेल. नोकरी-व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. त्यात फारसे बदल होणार नसले तरी काहींना अचानक बदली किंवा कामातील बदल स्वीकारावा लागू शकतो. व्यवसायात मात्र तूर्त मोठे बदल होण्याची शक्यता नाही. गुंतवणूक करताना कुठेही आपला पैसा फसणार नाही, फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सावध रहावे.
शुभ दिनांक-१७,१८,१९.
मकर-गाफील राहू नये
भाग्यस्थानात असलेला गुरु आपणास सध्या सारेकाही सुखेनैव चालावे असे योग देत असल्याने काळजीचे कारण नाही. मात्र साडेसाती देखील सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गाफील न राहण्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायातील वातावरण सामान्य राहील. त्यात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाही. काहींना मात्र एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या योजना, नव्या संकल्पना योग्यरीत्या काम करीत असल्याचे दिसेल. आपली प्रतिष्ठा उंचावेल. काहींना व्यावसायिक दौरे घडू शकतात. त्यात यश मिळेल.
शुभ दिनांक- १९,२०,२१.
कुंभ- उत्तम व्यावसायिक संधी
राशीस्वामी शनि लाभात व आठवड्याच्या सुरुवातीस चंद्र दशमात आहे. यामुळे आपल्या कर्मस्थानास बळ मिळत असल्याने आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या उत्तम संधी लाभू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना उत्तम संधी लाभू शकेल. व्यवसायात असलेल्यांच्या कामाचा उत्साह दुणावेल. उत्पन्नात वाढ होईल. सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. आपल्या कामगिरीचे कौतुक होईल. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांनाही जोडीदाराच्या मदतीने उत्तम वाटचाल करता येईल. आपले जीवनमान उंचावेल. कुटुंबाचे व मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रवास योग संभवतात.
शुभ दिनांक- १८,१९,२२.
मीन- बेसावध राहू नये
राशीस्वामी गुरु सप्तमातून आपणांस बळ देत आहे आणि राशीत शुक्र मुक्कामाला आहे. ही स्थिती काहींना नसत्या कल्पनाविलासात रममाण करणारी ठरू शकते. मस्तमौजीपणा निर्माण करू शकते. मात्र असे असले तरी बेसावध राहू नये. आळस, गाफीलपणा धोका देऊ शकतो. व्यवसाय व नोकरीत आपणांस समाधान लाभणार असले तरी केवळ दुसर्‍यावर विसंबून राहता येणार नाही. कामाचे व वेळेचे सुयोग्य नियोजन करणे फायद्याचे ठरेल. सकारात्मक भूमिकेतून व वक्तशीरपणे केलेल्या कामांमुळे आपली बाजू उंचावली जाऊ. आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगावयास हवी. युवकांना विवाहाचे उत्तम योग लाभू शकतात.
शुभ दिनांक- १९,२०,२१.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६