महामार्गालगतचे ‘ओलित’ सुरू राहणार!

0
75

मुंबई,१५ एप्रिल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेले मुंबई-ठाण्यातील महामार्गालगतची दारुची दुकाने आता मोकळी झाली आहेत. प्रवास करताना घसा कोरडा झाला तर ‘ओलिता’ची सोय पूर्व आणि पचिश्म महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित केल्याने पूर्ववत होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढील ५ वर्षांसाठी हे दोन्ही महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित केले आहेत. राज्य आणि केंद्रीय महामार्गांवर दारुची दुकाने बंद करावीत, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, संबंधित रस्ते महानगरपालिका किंवा एमएमआरडीएसारख्या संस्थाच्या हद्दीत वर्ग करून सगळ्यांचीच ‘सोय’ पाहण्यात आल्याचे बोलले जाते आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानांबरोबरच बार, दारू विक्री करणारी रेस्टॉरंट चालविण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील २५ हजार ५१३ दारू विक्रीच्या परवान्यांपैकी १५ हजार ६९९ दुकाने बंद झाली आहेत. (वृत्तसंस्था)