ट्रम्पविरोधात १५० शहरांत आंदोलन

0
152

वॉशिंग्टन,१६ एप्रिल 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची आयकर विवरण पत्रे जाहीर करावीत या मागणीसाठी अमेरिकेतील १५० पेक्षा अधिक शहरांत आज आंदोलने करण्यात आली. ट्रम्पविरोधातील या निदर्शनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
वॉशिंग्टन, लॉस एन्जेलिस, न्यूयॉर्क आणि शिकागो या मोठ्या शहरांत ही निदर्शने करण्यात आले. न्यूयॉर्कमधील निदर्शनांत ५ हजार पेक्षा जास्त लोक सहभागी होते. या मोर्चांत मानवी हक्कांसाठी काम करणार्‍या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
कॅलिफोर्नियातील रॅलीत ट्रम्प विरोधक आणि समर्थक यांच्यात झटापट झाल्याचे वृत्त असून त्यात ९ जणांना अटक झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची आयकरची विवरणपत्रे सादर करून प्रशासनात पारदर्शकता आणावी, मागणी आंदोलकांनी यावेळी केली. (वृत्तसंस्था)