जपानी शालेय अभ्यासक्रमात हिटलरचा ‘माझा लढा’

0
177

टोकियो, १६ एप्रिल 
जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याचे आत्मचरित्र माझा लढा (माईन काम्फ) हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरण्यास जपान सरकारने परवानगी दिली आहे. अशाच प्रकारच्या आणखी एका वादग्रस्त पुस्तकाला जपानने काही आठवड्यांपूर्वीच पाठ्यपुस्तक म्हणून मान्यता दिली होती.
माझा लढा हे नाझी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी हिटलरने लिहिलेले पुस्तक आहे. जर्मनीसहित जगातील अनेक देशांमध्ये त्यावर बंदी आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून त्याला परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मात्र वांशिक द्वेष पसरविण्यासाठी त्याचा वापर केल्यास सरकार कडक कारवाई करेल, असे जपान टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे. यापूर्वी ‘इम्पिरियल रिस्क्रिप्ट ऑन एज्युकेशन’ या वादग्रस्त पुस्तकाला शैक्षणिक साहित्य म्हणून परवानगी देण्यात आली होती. हे पुस्तक देशभक्ती आणि जपानी सम्राटाप्रति निष्ठेची शिकवण देते. जपानमध्ये सैनिकशाहीचा प्रसार करण्यात या पुस्तकाचा मोठा
वाटा आहे, असे इतिहासकारांचे मत आहे. (वृत्तसंस्था)