मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का?

0
174

गायक सोनू निगमचा खडा सवाल
मुंबई, १७ एप्रिल 
देशात तिहेरी तलाक, गोहत्या बंदी, कत्तलखान्यांवरील बंदी, बुरखा पद्धती, समान नागरिक कायदा याबाबत राष्ट्रीय स्तरावर वाद-प्रतिवाद सुरू असताना सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने त्यात आणखी एका सामाजिक मुद्याची भर टाकली आहे. मी मुस्लिम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?, असा सवाल करत, त्याने मुस्लिमांच्या मशिदींमधील अजानवरच आक्षेप घेतला आहे.
सोनू निगमने ट्विट करताना म्हटले आहे की, मी मुसलमान नाही. तरीसुद्धा मला सकाळी अजानचा आवाज ऐकून उठावे लागते. माझ्यावरील ही धार्मिक जबरदस्ती केव्हा थांबणार आहे?
त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट करताना म्हटले आहे की, मला वाटत नाही की कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये विजेचा वापर करून, त्या धर्माचे पालन न करणार्‍या लोकांना जबरदस्ती झोपेतून
उठवले जाते. ही तर गुंडागर्दी आहे.
जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणार्‍या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्‍वास नाही, असेही सोनू निगमने म्हटले आहे.  (वृत्तसंस्था)
सोशल मीडियावर वाद-प्रतिवाद
सोनू निगम याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच या विषयावरू वाद-प्रतिवादाला सुरुवात झाली आहे. काहींनी त्याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला आहे.प
कर्कश आवाज एडिसननंतरचा
मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, असा प्रश्‍न सोनू निगम याने ट्विटमधून विचारला आहे.