अँजेलिना जोलीचा अभिनयाला राम राम

0
271

मुंबई : अभिनेत्री अँजेलिना जोलीने अभिनेता ब्रॅड पीटसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनयातून संन्यास घेण्याचा विचार केला असून आपल्या मुलांना तिला अधिकवेळ द्यायचा आहे. मात्र ती पटकथा लेखन आणि दिग्दर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अँजेलिनाचे सर्व लक्ष तिच्या मुलांच्या संगोपनावर असून ती आपले लक्ष मुलांना वाढवणे आणि चित्रपटांची निर्मिती करणे यावर केंद्रीत करणार आहे. तिला अभिनय करायचा नाही. अभिनयाला तिने राम राम ठोकला असल्याचे सूत्राने सांगितले आहे. अँजेलिनाने परदेशी भाषेतील चित्रपट ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर : अ डॉटर ऑफ कंबोडिया रिमेम्बर्स’चे शूटींग नुकतेच पार पाडले असून हा चित्रपट नेटफ्लिक्स ऍप्लिकेशनवर प्रदर्शित होणार आहे.