‘बाहुबली २’ कर्नाटकात प्रदिर्शित होणार?

0
265

मुंबई : ‘बाहुबली २’ चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काहीच दिवस बाकी असताना, कन्नड प्रांतात हा चित्रपट कदाचित दाखवण्यात येणार नाही. बाहुबली चित्रपटाला कर्नाटकात प्रदर्शित होऊ न देण्याचा निश्चय काही कन्नड संघटनांनी घेतला आहे. त्यांच्या या विरोधाला खरा कारर्णीभूत आहे, तो कटप्पाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सत्यराज आहे.
सत्यराजने कावेरी पाणी प्रकरणात सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कर्नाटकात राहणार्‍या नागरिकांविरोधात सत्यराजने तर्कहीन विधाने केली असल्याचा आरोप कन्नड संघटनेचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता वतल नागराजने केला आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नागराज म्हणाला की, कर्नाटकमधील एकाही चित्रपटगृहात आम्ही हा चित्रपट लावू देणार नाही. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही तर कट्‌टप्पा ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेता सत्यराजच्या विरोधात आहोत. कर्नाटकमधील जनतेची माफी सत्यराजने मागितली तर येथे ‘बाहुबली २’ चित्रपट प्रदर्शित केला जाईल. आता हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही हे कट्‌टप्पा अर्थात सत्यराजच्याच हातात आहे असे म्हणावे लागेल.